स्वप्ने बघा.

स्वप्ने पहाण एक चांगली सवय आहे. किंवा चांगले जीवन जगायचे असेल तर स्वप्ने पहायलाच हवित.
तुमची स्वप्ने खरी करायला त्या नंतर प्रयत्न करायला हवेत. अन्यथा स्वप्ने खरी कशी उतरणार ?
उघड्या डोळ्यांनी स्वप्ने बघायची. त्यानंतर तीव स्वप्ने डोळे बंद करुन बघायची, व ती प्रत्यक्षात उतरताहेत अशी कल्पना करायची. असे करुन बघा त्यातुन तुम्हाला प्रेरणा मिळेल व तीच प्रेरणा कायम जागृत ठेवणे केवळ तुमच्या हाती आहे.
चला तर आजच सुरुवात करा स्वप्ने बघायला।

नशिब.

बरेच लोकं नशिबाला यशाचा पुर्ण मानकरी ठरवतात किंवा अपयशाचा. पण माझ्यामते पुर्णपणे नशिबावर अवलंबून कोणिही आजपर्यंत यशस्वी झालेला नाही. फार फार तर नशिब तुम्हाला एका टप्प्या पर्यंत घेवून जाणार त्यानंतर तुमचे प्रयत्नच यशाला कारण असतात. अन्यथा ते यश पचवणे अवघड असते.
यशस्वी होण्यास काही सवयी अंगी बाळगणे आवश्यक आहे. ज्याबद्दल पुढील लेखात.

प्रारंभ.

बिल गेट्स, धिरूभाई अंबानी, रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, काहिही शिक्षण नसतांना एकाचे तीन दुकाने करणारा आमचा वाणी, हातगाडी वर सुरुवात करून आज एक मॊठ्ठं दुकान थाटणारा एक परिचयाचा सिंधी, अभियांत्रीकीला आठ वर्षात डिग्री मिळवणारा व त्यानंतर एका परदेशी कंपनीत सहज नोकरी मिळवणारा मिलींद. अशा बर्‍याच जणांबद्दल मी कुतूहलाने जेंव्हा विचार करतो तेंव्हा मला य़श म्हणजे काय याची व्याख्या करणे खरच अवघड जाते.
यश कशाला म्हणावं ?
आयुष्यात एखादी कामगीरी चांगली करणार्‍‍या माणसाला यशस्वी म्हणता येईल कां ? कि यशस्वी माणूस हा कायमच यशस्वी रहायला हवा ?
तर बिल गेट्स हा कायमचं पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत असायला हवा. आज तो पहिल्या क्रमांकावर नाही तर त्याला काय म्हणणारं ?
मी या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. आणि या सर्वांनी हे कसं मिळवलं हेही वाचत आहे.

यश म्हणजे काय रे भाऊ.

बरेच लोक आपल्या आयुष्यात यशाची वाट बघत असतात. हे यश म्हणजे काय असतं ? तुम्ही यशाची व्याख्या काय / कशी करणार ? आणि यश म्हणजे काय ?