प्रारंभ.

बिल गेट्स, धिरूभाई अंबानी, रतन टाटा, लक्ष्मी मित्तल, काहिही शिक्षण नसतांना एकाचे तीन दुकाने करणारा आमचा वाणी, हातगाडी वर सुरुवात करून आज एक मॊठ्ठं दुकान थाटणारा एक परिचयाचा सिंधी, अभियांत्रीकीला आठ वर्षात डिग्री मिळवणारा व त्यानंतर एका परदेशी कंपनीत सहज नोकरी मिळवणारा मिलींद. अशा बर्‍याच जणांबद्दल मी कुतूहलाने जेंव्हा विचार करतो तेंव्हा मला य़श म्हणजे काय याची व्याख्या करणे खरच अवघड जाते.
यश कशाला म्हणावं ?
आयुष्यात एखादी कामगीरी चांगली करणार्‍‍या माणसाला यशस्वी म्हणता येईल कां ? कि यशस्वी माणूस हा कायमच यशस्वी रहायला हवा ?
तर बिल गेट्स हा कायमचं पहिल्या क्रमांकाचा श्रीमंत असायला हवा. आज तो पहिल्या क्रमांकावर नाही तर त्याला काय म्हणणारं ?
मी या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधत आहे. आणि या सर्वांनी हे कसं मिळवलं हेही वाचत आहे.

1 comment:

मोरपीस said...

फ़ारच छान विषय़ आपण घेतला आहे.